गँगस्टर फझल उल रेहमानला अटक

गिरगावातील व्यापाऱ्याकडे फजलने जूनमध्ये २००५ मध्ये १ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र खंडणी न देता व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

गँगस्टर फझल उल रेहमानला अटक
SHARES

खंडणी न दिल्याने गिरगावमधील व्यापाऱ्यावर २००५ मध्ये गोळीबार करणाऱ्या गँगस्टर फझल उल रेहमानला मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्या विरोधात मुंबई, नवी मुंबई, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये ४२ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

गिरगावातील व्यापाऱ्याकडे फजलने जूनमध्ये २००५ मध्ये १ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र, खंडणी न देता व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यामुळे൦ फजलने आॅक्टोबरमध्ये व्यापाऱ्याला भटवाडी परिसरात गाठून त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात व्यापारी थोडक्यात बचावला. त्यानंतर दा.भ.मार्ग पोलिस ठाण्यात फजलविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा गुन्हा पुढे खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला.

खंडणी विरोधी पथकाने गुन्ह्याचा सखोल अभ्यास सुरू केला. या प्रकरणात रेहमान टोळीच्या सजीद उर्फ राजू बबलू बशीर अहमद सय्यद (४५), हुसेन खुर्शीद आलम शेख उर्फ हसन उर्फ सलीम (३५), शेरू नासीर हुसेन शेख(३३) यांच्यासह सिराज आलम कमाल अहमद सय्यद (४१) यांना अटक केली होती. या प्रकरणात रेहमान हा वेळोवेळी पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरत होता. दरम्यान, रेहमानला गुजरात पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली. त्याची रवानगी न्यायालयाने साबरमती कारागृहात केली. त्यानंतर त्याचा ताबा मुंबई पोलिसांना देण्यात आला. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलिस अधिक तपास करत आहेत.  



हेही वाचा - 

१३ व्या मजल्यावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा