घाटकोपर - गेल्या काही दिवसांपासून घाटकोपर परिसरात मोठ्या प्रमाणात घरफोड्या वाढल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी परिसरात रात्रीची गस्त अधिक वाढवली होती. अशाच प्रकारे घाटकोपर पोलीस मंगळवारी रात्री झुनझुनवाला महाविद्यालय परिसरात गस्त घालत असताना त्यांना फिरोज सय्यद (४२) हा संशयास्पद फिरताना आढळून आला. चौकशीत तो सराईत घरफोडी करणारा आरोपी असल्याचं समोर येताच पोलिसांनी त्याला अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी ६ लाखांचा ऐवज हस्तगत केला असून, त्याची पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
