गिरगावात गळफास घेऊन तरूणीची आत्महत्या


गिरगावात गळफास घेऊन तरूणीची आत्महत्या
SHARES

गिरगावमध्ये २२ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. निकीता नारकर असं या तरूणीचं नाव असून ती एल्फिन्स्टन येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. या प्रकरणी व्ही.पी.रोड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली अाहे. 


नैराश्येतून उचललं पाऊल 

गिरगाव परिसरात कुटुंबियांसोबत राहणारी निकिता ही बुधवारी एकटीच घरी होती. मागील काही दिवसांपासून ती नैराश्येत होती. याच नैराश्येतून तिने ओढणीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. निकिताच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांना तिच्या मृतदेहाजवळ कसलीही चिठ्ठी आढळून आलेली नाही. पोलिसांनी तिचा मृतदेह जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलिस निकिताच्या आत्महत्येमागील कारण शोधत आहेत.हेही वाचा - 

आधार, पॅनच्या सहाय्याने बँक खात्यावर डल्ला

फर्निचरचं काम पडलं महागात, सुतारानं ४ लाखांचं सोनं लांबवलं
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा