आधार, पॅनच्या सहाय्याने बँक खात्यावर डल्ला


आधार, पॅनच्या सहाय्याने बँक खात्यावर डल्ला
SHARES

मुंबईकरांनो सावधान! तुमच्या पॅनकार्ड किंवा आधारकार्डच्या मदतीने चोरटे तुमच्या खात्यातून पैसे चोरू शकतात. नुकतीच अशाच प्रकारच्या घटनेची तक्रार बोरिवली रेल्वे पोलिसांकडे आली आहे. आधार व पॅनकार्ड आणि ओटीपी क्रमांकाच्या मदतीने भामट्यांनी २५ वर्षीय तरुणीच्या  खात्यातून ५६ हजार रुपये लंपास केल्याचं पुढं आलं आहे. 


ओटीपी क्रमांक मागितला

तक्रारदार तरूणी २० डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे लोकलने सकाळी कामाला निघाली होती. तिची लोकल कांदिवली व बोरिवली स्थानकांदरम्यान आली असता तिला तोतया बॅँक अधिकाऱ्याचा दूरध्वनी आला. चोराला तरुणीच्या बॅँक खात्याबाबतची माहिती होती. प्रथम त्याने तिला आधार कार्ड व पॅनकार्ड क्रमांक दिला. यंत्रणा अद्ययावतीकरण करण्यासाठी प्रक्रिया सुरू असून त्यासाठी बँकेकडून तुम्हाला ओटीपी क्रमांक येईल, त्याची माहिती देण्यास सांगितले. कार्डचा क्रमांक दिला नसल्यामुळे तिने ओटीपी क्रमांक तोतया बॅँक अधिकाऱ्याला दिला. त्यानंतर तिच्या खात्यावरून ५६ हजार रुपये काढण्यात अाले. 


चोरट्याला खात्याची माहिती

ईपीएस सुविधा सुरू असल्यास केवळ आधारकार्डच्या सहाय्यानेही बॅँक खात्यातून पैसे काढता येऊ शकतात. त्यावेळी केवळ ओटीपी क्रमांकाची आवश्‍यकता असते. हा ओटीपी नंबर मिळाल्यानं आरोपीने हे पैैैसे काढले. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीला तिच्या बँक खात्याची माहिती होती. त्याच्याकडे तरुणीचा आधारकार्ड व पॅनकार्ड क्रमांकही माहित होता. पण तिने एटीएम कार्ड क्रमांक व पासवर्ड आरोपीला दिला नसल्याचं तक्रारीत नमूद केलं आहे. 



हेही वाचा - 

फर्निचरचं काम पडलं महागात, सुतारानं ४ लाखांचं सोनं लांबवलं

तुर्भे स्थानकावर महिलेसमोर हस्तमैथुन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा