गोवंडीत खाद्य गोदामाला आग

 Govandi
गोवंडीत खाद्य गोदामाला आग
Govandi, Mumbai  -  

गोवंडीत एका खाद्य गोदामाला शार्टसर्किटमुळे शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास मोठी आग लागली. गोवंडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला 'सुप्रिया फूड प्रॉडक्ट' नावाचे गोदाम आहे. या गोदामात शार्टसर्किटमुळे आग लागून ती तत्काळ सर्वत्र पसरली.

गोदामातील कर्मचाऱ्यांना या आगीची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ ही बाब अग्निशमन दल आणि पोलिसांना सांगितली. त्यानुसार देवनार आणि चेंबूर अग्निशमन दलाच्या 4 गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. गोदामात मोठ्या प्रमाणात किराणा आणि इतर सामान असल्याने जवानांना ही आग विझवण्यात मोठी अडचण येत होती. मात्र जवानांनी त्याची पर्वा न करता काही वेळातच ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा कुणीही जखमी झाले नाही. मात्र या आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात अर्थिक नुकसान झाले आहे.

Loading Comments