7 किलो सोन्यासह एकाला अटक

  Pali Hill
  7 किलो सोन्यासह एकाला अटक
  7 किलो सोन्यासह एकाला अटक
  7 किलो सोन्यासह एकाला अटक
  See all
  मुंबई  -  

  मुंबई - कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई एयरपोर्टवर सोन्याची तस्करी करणाऱ्या व्यक्तीला अटक केलीये. नवरतन गोलेचा असं त्याचं नाव आहे. तो रायपूरहून जेट एअरवेजच्या विमानानं मुंबईत आला होता. त्याच्याकडून 7 किलो 378 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलंय. बाजारात याची किंमत सुमारे 2 कोटी रुपये इतकी आहे. त्याचबरोबर साडे सात लाखांच्या नोटाही ताब्यात घेण्यात आल्या आहेत. सोन्यावर फॉरेन मार्किंग्स आणि गोल्ड बार असून ते कॉइनच्या स्वरुपात आहे. जप्त करण्यात आलेल्या नोटांत दोन हजारच्या नवीन नोटा आणि 100 रुपयाच्या नोटाही आहेत. नवरतनला 9 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.