अपंग बनून आला आणि चोरी करून गेला

पोलिसांनी संशयित आरोपीबाबत विचारले असता महिलेने सांगितलं की, त्याचा चेहरा अस्पष्ट दिसला पण त्याच्या अंगाला घामाचा खूपच दुर्गंध येत होता.

अपंग बनून आला आणि चोरी करून गेला
SHARES
मुंबईत चोरटे कोणत्या रुपात ते येतील आणि चोरी करून जातील हे सांगणं अशक्य आहे. असाच काहीसा प्रकार जोगेश्वरीच्या मेघवाडी परिसरात घडला आहे. वृद्ध महिलेसमोरून लंगडत येत, चोराने वृद्धेच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढला. मात्र, वृद्ध महिलेने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपीला काही तासात पकडलं. मेहम्मूद शेख (३०) असं या आरोपीचं नाव आहे.

जोगेश्वरीच्या मेघवाडी परिसरात राहणारी  ७५ वर्षीय महिला २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी रस्त्याने एकटी घरी निघाली होती. एकटी महिला आणि तिच्या गळ्यातील मौल्यवान दागिने पाहून मेहम्मूदचे डोळे चमकले. वृद्धेचे दागिने चोरण्यासाठी आणि तिला संशय येऊ नये म्हणून त्याने अपंग असल्याचं नाटक केलं. लंगडत तो महिलेच्या जवळून  पुढे गेला. महिला पाटमोरी असताना मेहम्मूदने पाठीमागून येत तिच्या गळ्यातील दागिने हिसकावून अंधारात पळ काढला. या प्रकरणी  महिलेने मेघवाडी पोलिसात तक्रार नोंदवली. त्यावेळी पोलिसांनी संशयित आरोपीबाबत विचारले असता महिलेने सांगितलं की, त्याचा चेहरा अस्पष्ट दिसला पण त्याच्या अंगाला घामाचा खूपच दुर्गंध येत होता.  

पोलिसांनी परिसरातील सर्व भुरट्या चोरांना पकडण्यास सुरूवात केली. त्याचवेळी नुकताच जेलमधून सुटलेल्या मेहम्मूदजवळ पोलिस गेले असता त्याच्या संशयित हालचालीवर पोलिसांना संशय येत आला. त्याच्या अंगाला दुर्गंधीचा वास येत असल्याने त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. महिलेसमोर मेहम्मूदला उभं करताच महिलेने त्याला ओळखलं. जेलमधून सुटल्यानंतर खिशात एक रुपयाही नव्हता. भूकही प्रचंड लागली होती. त्यामुळे चोरी केल्याची कबुली मेहम्मूदने दिली. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर निरगुडकर यांनी दिली.



हेही वाचा  -





संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा