निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचं निधन

राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचं मुंबईतील हरकिसनदास रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते.

निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचं निधन
SHARES

राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचं मुंबईतील हरकिसनदास रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अशी इनामदार यांची ओळख होती. लेखक म्हणूनही अरविंद इनामदार प्रसिद्ध होते.

मंत्रालयाजवळील शलाका या निवास्थानी त्यांचे पार्थिव अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. मरिन ड्राईव्हच्या चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

नाशिकमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रात दीर्घकाळ काम केलं. अनेक नवख्या पोलिसांना घडविण्यात अरविंद इनामदार यांचा मोलाचा वाटा होता. जळगावमधील गाजलेलं सेक्स स्कॅण्डल प्रकरणाचा उलगडा त्यांनी यशस्वीपणे केला होता. साहित्य वर्तुळातही त्यांचा मोठा वावर होता. खुसखुशीत भाषा शैली आणि विनोदबुद्दीमुळे ते ऐकणाऱ्यांच्या मनाची सहज पकड घेत असत. हेही वाचा-

प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने लिहिल्या शेकडो चिठ्ठ्या

रस्त्यात मुलींसमोर अश्लील चाळे करणाऱ्यास अटकसंबंधित विषय