रस्त्यात मुलींसमोर अश्लील चाळे करणाऱ्यास अटक

दोघींही गप्पा मारत असताना आरोपी कप्तान शेख हा मागून आला. त्यावेळी तरुणींकडे पाहून तो अश्लील चाळे करत होता.

SHARE
‘महिलांसाठी देशातील सर्वात सुरक्षित शहर’ असं बिरूद मिरवणाऱ्या मुंबईत महिलांविरोधी गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कुर्ला फिनिक्स माॅल येथे रस्त्यावर तरुणींना पाहून अश्लील चाळे करणाऱ्या कप्तान शेख या रोडरोमियोला अटक केली आहे.

कुर्लाच्या फिनिक्स माॅल परिसरात राहणारी पीडित तरुणी ४ आॅक्टोबर रोजी कामाला जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी वाटेत तिला तिची शाळेतली मैत्रीण भेटली. दोघींही गप्पा मारत असताना आरोपी कप्तान शेख हा मागून आला. त्यावेळी तरुणींकडे पाहून तो अश्लील चाळे करत होता. त्याच्या कृत्याकडे पाहून दोघींही घाबरल्या. मुलींनी आरडा -ओरडा केल्यानंतर जमावाने कप्तानला पकडून चोप दिला. 

त्यावेळी एका तरुणीने या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर घाटकोपर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी कप्तान शेख याला अटक केली आहे. कप्तान विरोधात पोलिसांनी ३५४, ५०९ भा.द.वि अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.हेही वाचा -

शिवडीत ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
संबंधित विषय
ताज्या बातम्या