शिवडीत ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

सहानी हा शौचालयाच्या बाहेर उभा होता. यावेेळी त्या ठिकाणी पीडित मुलगी एकटी खेळत होती. सहानीने ती एकटी असल्याचे पाहून तिला जवळ बोलावलं.

शिवडीत ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
SHARES
 शिवडी परिसरात असलेल्या शौचालयात ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.  या प्रकरणी शिवडी पोलिसांनी चंदन सहानी (२५) याला अटक केली आहे.

शिवडीच्या बीपीटी काॅलनी परिसरातील सार्वजनिक शौचालयात सहानी हा सफाई कर्मचारी म्हणून काम करतो. ४ आॅक्टोबर
रोजी सहानी हा शौचालयाच्या बाहेर उभा होता. यावेेळी त्या ठिकाणी पीडित मुलगी एकटी खेळत होती. सहानीने ती एकटी असल्याचे पाहून तिला जवळ बोलावलं. चाॅकलेट देण्याचं आमीष देऊन तिला शौचालयात नेलं. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. 

पीडित मुलीने आरडा ओरडा करण्यास सुरूवात केल्यानंतर सहानीने तिला सोडून दिले. घडलेला प्रकार मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर तिच्या आईने शिवडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी सहानीला ३७६,५०६  भादवी, पोस्को कायद्याच्या ४,१८,१२ नुसार अटक केली आहे.हेही वाचा  -

लोकलवर फेकलेल्या वस्तूमुळं प्रवासी जखमी

Exclusive : काश्मिरपेक्षा महाराष्ट्र हिंसक, कसा ते वाचा ...
Read this story in हिंदी
संबंधित विषय