गोरेगावमध्ये पत्रकार तरुणीला अश्लील मेसेज पाठवणार गजाआड

Goregaon
गोरेगावमध्ये पत्रकार तरुणीला अश्लील मेसेज पाठवणार गजाआड
गोरेगावमध्ये पत्रकार तरुणीला अश्लील मेसेज पाठवणार गजाआड
See all
मुंबई  -  

गोरेगावमध्ये एका 23 वर्षीय पत्रकार तरुणीला मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून मारण्याची धमकी देणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इमरान हबीब(34) असं या नराधमाचं आहे. मिळालेल्या माहितीनुसार  पीडित तरुणी रिचार्ज करण्यासाठी दुकानावर गेली असता या नराधमाने रिचार्जच्या बहाण्याने तिचा नंबर घेतला.त्यानंतर मागील एक आठवड्यापासून तो तिला अश्लील मेसेज पाठवू लागला. मात्र शुक्रवारी हा नराधम या पीडित तरुणीच्या घरात घुसला आणि तिच्यावर जबरदस्ती करू लागला. शनिवारी जेव्हा ही तरुणी तिच्या ऑफिसला गेली तेव्हा तिच्या सहकाऱ्यांनी तिला एवढी घाबरलेली का आहेस? असं विचारलं. तेव्हा तिने सगळा प्रकार आपल्या सहकाऱ्यांना सांगितला. अखेर तिच्या सहकाऱ्यांनी बजरंग दलाच्या मदतीने त्या नराधमांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर देखल घेत पोलिसांनी त्याला 354, 504, 506 आणि 354(द) कलमांतर्गत अटक केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.