डॉक्टराकडे खंडणी मागणारे अटकेत

 Govandi
डॉक्टराकडे खंडणी मागणारे अटकेत

गोवंडी - मुलीची छेड काढल्याचा खोटा बनाव करत गोवंडीच्या शिवाजी नगरमधील एका डॉक्टराकडे 10 लाखांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. अलीम खान, कौसर शेख आणि नवाब शेख अशी या आरोपींची नावे असून त्यांनी डॉक्टर अख्तर खान यांच्याकडे 10 लाखांची खंडणी मागितली होती. याबाबत डॉक्टर खान यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत या आरोपींना अटक केली. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश असून महिलेचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रुपेश दळवी यांनी दिली.

Loading Comments