वृद्धेनेच वृद्धेला लुटले

 Pali Hill
वृद्धेनेच वृद्धेला लुटले

चेंबूर - एका वृद्ध महिलेनेच दुसऱ्या वृद्ध महिलेला लुटल्याचा प्रकार चेंबूरमध्ये उघडकीस आला आहे. नाशिक येथे राहणारी वत्सला आहिरे (75) ही वृद्ध महिला चार दिवसांपूर्वी राजावाडी रुग्णालयात नातवाची देखरेख करण्यासाठी आली होती. याचदरम्यान त्यांची राणी नावाच्या महिलेसोबत ओळख झाली. दरम्यान 14 जानेवारीला राणी या आरोपी महिलेने वडापाव खाण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेस रुग्णालयाच्या बाहेर नेले आणि वडापावमधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी घेउन पोबारा केला. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर महिलेने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. त्यानुसार त्यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या महिलेवर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

Loading Comments