वाहतुकीचे नियम पाळले म्हणून त्याचा जीव वाचला!

 Sewri
वाहतुकीचे नियम पाळले म्हणून त्याचा जीव वाचला!

शिवडी - देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय नुकताच शिवडीमध्ये आला. पांजरपोळकडून सीएसटीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या होंडा सिटी कारचा शिवडी येथील पोल क्रमांक 152 जवळ पुढचा टायर फुटला. त्यामुळे कार चालक राजेश वीरजी पटेल ( 22) यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यातच मागचा टायर फुटल्याने गाडी तीन चार वेळा पलटी मारून पुलाच्या सुरक्षा भिंतीवर उलटून स्थिर झाली. सुदैवाने ही कार पुलावरून खाली पडली नाही. मात्र या अपघातात कारचा संपूर्ण चक्काचूर झाला आहे.

वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या या वाहनचालकाने एअर बॅग आणि सीट बेल्ट लावला त्यामुळे वाहनचालक वाचला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी कार चालकास सुखरूप बाहेर काढले. ही घटना शुक्रवारी पहाटे 4.15 वा. घडली. याबाबत शिवडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात झाली असून, अधिक तपास सुरु आहे. जखमी कारचालकास रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्याला किरकोळ खरचटले आहे.

Loading Comments