माकडिणीशी अनैसर्गिक कृत्य?

गोरेगाव - मुंबईच्या गोरेगाव परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका वॉचमनवर माकडिणीशी अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप लावण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने या वॉचमनवर हा आरोप केला आहे.

गोरेगावमध्ये राहणाऱ्या या वॉचमनने माकडिणीसोबत अनैसर्गिक कृत्य केलं, असा आरोप एका सामाजिक कार्यकर्त्याने केलाय. याविरोधात सदर सामाजिक कार्यकर्त्याने आरे पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसेच वॉचमनच्या या विकृत कृत्याचे काही फोटो आणि व्हिडिओ असल्याचा दावाही सामाजिक कार्यकर्त्याने केलाय. या सामाजिक कार्यकर्त्याने फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीत केले आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच वन विभागाने या माकडिणीची सुटका केली. या फोटो आणि व्हिडिओची पडताळणी करण्यात येईल आणि पुराव्यांमध्ये काही तथ्य आढळल्यास वॉचमनवर कारवाई करण्यात येईल, असे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ठाण्यातल्या पशू चिकित्सालयात या माकडिणीचे मेडिकल चेकअप करण्यात येणार आहे.

Loading Comments