मध्यस्थी महिलेची फसवणूक करण्यासाठी रचलेला कट व्यावसायिकाच्या अंगलट

तरुणीला निघताना राहुलने ८४ हजार रुपये दिले. ते पैसे तरुणीने टीएममधून तिच्या खात्यावर टाकले. दुसऱ्या दिवशी एटीएमचे पैसे बँकेत जमा करण्यात आल्यानंतर तपासणीत बँकेतील कर्मचाऱ्यांना २ हजाराच्या ४२ नोटा बनावट आढळून आल्या.

मध्यस्थी महिलेची फसवणूक करण्यासाठी रचलेला कट व्यावसायिकाच्या अंगलट
SHARES

सूडाच्या भावनेतून तिसऱ्यालाच अडकवण्यासाठी बनावट नोटा देणं गुजरातच्या व्यावसायिकाला चांगलंच अंगलट आलं आहे. बनावट नोटांची बाजारात तस्करी केल्याच्या गुन्ह्यात राहुल बोराडे (२९) या व्यावसायिकासह वांद्रे पोलिसांनी एका २८ वर्षीय माॅडेलला अटक केली आहे.

 

धडा शिकवण्यासाठी कट

गुजरातच्या अहमदाबाद परिसरात व्यावसाय असलेला राहुल महिन्यातून एकदा मुंबईत कामानिमित्त यायचा. स्त्रीलंपट असलेला राहुल मुंबईत आला की, महिलांवर अफाट पैसे उधळायचा. यातूनच त्याची ओळख एका महिलेशी झाली होती. राहुल मुंबईत आला की तो त्या मध्यस्थी महिलेला फोन करून शरीर संबंधांसाठी तरुणींची मागणी करायचा. त्यानुसार मध्यस्थी महिला राहुलकडे तरुणींना जाण्यास सांगायची.  मात्र एका व्यवहारावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे मध्यस्थी महिलेला त्याला धडा शिकवायचा होता.


एटीएममध्ये  बनावट नोटा

 एप्रिल महिन्यात राहुल मुंबईत आला होता. यावेळी त्याने त्या मध्यस्थी महिलेशी संपर्क साधला. त्यानुसार मध्यस्थी महिलेने एका माॅडेलला राहुल थांबला असलेल्या सांताक्रूझ येथील पंचतारांकीत हाॅटेलमध्ये पाठवले. तरुणीला निघताना राहुलने ८४ हजार रुपये दिले. ते पैसे तरुणीने  टीएममधून तिच्या खात्यावर टाकले. दुसऱ्या दिवशी एटीएमचे पैसे बँकेत जमा करण्यात आल्यानंतर तपासणीत बँकेतील कर्मचाऱ्यांना २ हजाराच्या ४२ नोटा बनावट आढळून आल्या. हे पैसे ज्या एटीएममधून जमा करण्यात आले होते तेथील सीसीटिव्ही फूटेज तपासले. माॅडेल तरुणीने वांद्रे येथील बँकेच्या एटीएममध्ये पैसे जमा केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी वांद्रे पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी सीसीटिव्ही फूटेजच्या मदतीने पैसे जमा करणाऱ्या माॅडेलला अटक केली.


गुजरातमधून अटक

माँडेलच्या चौकशीत तिला ते पैसे राहुलने दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी राहुलच्या शोध सुरू केला. मोबाइल लोकशननुसार राहुल हा गुजरातच्या अहमदाबादमध्ये असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वांद्रे पोलिसांनी त्याला गुजरातहून अटक केली. राहुलच्या चौकशीत त्याने मध्यस्थी महिलेशी झालेल्या वादातून तिला धडा शिकवण्यासाठी तरुणीजवळ बनावट नोटा दिल्याची कबुली दिली. हे पैसे तरुणी मध्यस्थी महिलेला देईल, असा राहुलचा समज होता. मात्र, तरुणीने तसे न करता ते पैसे स्वतःच्या खात्यावर जमा केल्याने हे प्रकरण बाहेर आले. राहुलने हे बनावट पैसे कुठून आणले याची चौकशी वांद्रे पोलिस करत आहेत.हेही वाचा -

महिलांच्या चेजींगरुममध्ये कॅमेरा, एकाला अटक
संबंधित विषय