भूज-दादर एक्स्प्रेसमध्ये महिलेची गळा चिरून हत्या

या महिलेची हत्या झाल्याचं लक्षात आल्याबरोबर पोलिसांनी इथं धाव घेत हा मृतदेह ताब्यात घेतला. या महिलेच्या अंगावरील दागिने आणि तिच्याजवळील पैसे गायब असल्यानं लुटीच्या अंदाजे ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

भूज-दादर एक्स्प्रेसमध्ये महिलेची गळा चिरून हत्या
SHARES

भूज-दादर एक्स्प्रेस शुक्रवारी दादर स्थानकावर पोहचली आणि या एक्स्प्रेसमधील शेवटच्या डब्यात एक धक्कादायक बाब दिसून आली. एका ४० वर्षीय महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह या ठिकाणी पडलेला होता. या महिलेची हत्या झाल्याचं लक्षात आल्याबरोबर पोलिसांनी इथं धाव घेत हा मृतदेह ताब्यात घेतला. या महिलेच्या अंगावरील दागिने आणि तिच्याजवळील पैसे गायब असल्यानं लुटीच्या अंदाजे ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे रेल्वेतील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एका एेरणीवर आला आहे.


सूरतची रहिवासी

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गळा चिरून या महिलेची हत्या करण्यात आली आहे. बोरीवली ते दादर दरम्यान ही हत्या झाल्याचाही पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. हत्या झालेल्या महिलेच नाव दादीय देवी असून ती गुजरातच्या सूरतची रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. दादीया आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी सुरतवरून मुंबईला निघाल्या होत्या, तशी माहितीही त्यांनी आपल्या नातेवाईकांना दिली होती.


दादीयांचा शोध

पण, भूज-दादर एक्स्प्रेसमधून मुंबईला येण्यासाठी निघालेल्या दादीया एक्स्प्रेसमधून बाहेर पडल्याच नाहीत. त्यामुळं दादीयांना आणण्यासाठी दादर रेल्वेवर आलेल्या त्यांच्या नातेवाईकांची काळजी वाढली. त्यांच्याशी काहीही संपर्क होत नसल्यानं त्यांनी दादीयांचा शोध घेतला. शेवटी एका प्रवाशांना एक्सप्रेसच्या शेवटच्या डब्यात एक मृतदेह पाहिल्याचं सांगितलं.


गळा चिरून हत्या

त्याबरोबर एक्स्प्रेसच्या शेवटच्या डब्यात धाव घेतली असता दादीयाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दादीयांच्या नातेवाईकांना दिसला. दादीयाची हत्या गळा चिरून केल्याचं समोर आलं. या प्रकरणाची आता पोलिस कसून चौकशी करत असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.हेही वाचा-

उदानी हत्येप्रकरणी अभिनेत्री देबोलीना पोलिसांच्या ताब्यात

गँगस्टर डी. के. रावच्या हस्तकाची हत्यासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा