गँगस्टर डी. के. रावच्या हस्तकाची हत्या

मृत टी. पी. राजाविरोधात देखील पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. काही वर्षांपूर्वी डी. के. रावच्या इशाऱ्यावरून राजाने एका बँकेतील ६६ लाख लुटले होते. एका पोलिस अधिकाऱ्याचाही त्याने खून केला होता.

गँगस्टर डी. के. रावच्या हस्तकाची हत्या
SHARES

कुख्यात गुंड डी. के. रावच्या हस्तकाची त्याच्या घरात घुसून हत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता घडली. मारीमुथू पेरियास्वामी देवेंद्र उर्फ टी. पी. राजा (४०) असं या हस्तकाचं नाव आहे. याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


'अशी' केली हत्या

सायन कोळीवाडा येथील म्हाडा कॉलनीत भाड्याच्या राहत असलेला टी. पी. राजा हा डी. के. रावसाठी काम करायचा. शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्याच्या घरात दोन अज्ञात इसम घुसले आणि चाकूने त्याच्यावर वार करून हत्या केली. आरोपींनी त्याच्या गळ्यावर जबर वार केला आणि रक्ताने माखलेल्या कपड्यांवरच आरोपींनी इमारतीखाली उभ्या असलेल्या बाईकवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला.


गुन्हे दाखल

मात्र, बाईक सुरु होत नसल्याने त्यांनी बाईक सोडून पळ काढला. मृत टी. पी. राजाविरोधात देखील पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. काही वर्षांपूर्वी डी. के. रावच्या इशाऱ्यावरून राजाने एका बँकेतील ६६ लाख लुटले होते. एका पोलिस अधिकाऱ्याचाही त्याने खून केला होता.

याप्रकरणी मोक्का केसमध्ये राजा अटकेत होता. ३ वर्षांपूर्वी राजाची जामिनावर सुटका झाली होती आणि तो सायन कोळीवाडा इथं राहत होता. पोलिसांनी आरोपींची दुचाकी ताब्यात घेतली असून परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने त्याची ओळख पटवत आहेत.



हेही वाचा-

अभिनेत्री झरीन खानची माजी मॅनेजरविरोधात खार पोलिसांत तक्रार

व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी गृहनिर्माण मंत्र्यांच्या माजी सचिवाला अटक



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा