बोरिवलीमध्ये तरुणावर गोळीबार


बोरिवलीमध्ये तरुणावर गोळीबार
SHARES

बोरिवली - बोरिवली पूर्व मधील दौलत नगरमध्ये राहणाऱ्या एका जीम ट्रेनवर गोळीबार झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. दौलत नगरमध्ये राहणाऱ्या समशेर सुलेमान खान या 22 वर्षीय तरुणावर गोळीबार झाला असून, याप्रकरणी आरोपी कादर बादशाह या तरुणाला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार दहिसर पश्चिममध्ये राहणाऱ्या आरोपी कादर बादशाह आणि समशेर सुलेमान खान यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते. त्याच गोष्टीचा राग मनात धरत 12 नोव्हेंबरला कादर बादशाह याने समशेर सुलेमान खान याच्यावर गोळीबार केलाय. ओरोपी कादर बादशाह याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितली.

संबंधित विषय