मुंबईच्या अॅन्टाॅप हिल परिसरात १२ लाखाचा गुटखा जप्त


मुंबईच्या अॅन्टाॅप हिल परिसरात १२ लाखाचा गुटखा जप्त
SHARES

महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असताना देखील छुप्या पद्धतीने गुटख्याची सर्रास विक्री केली जाते. सध्या कोरोना संक्रमाणात गुटखा खाऊन  थुंकणाऱ्यांमुळे हा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच FDA ने छुप्या पद्धतीने गुटख्याची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. FDA ने नुकतीच अँण्टाँप हिल परिसरात कारवाई करत तब्बल १२ लाखांचा गुटखा हस्तगत केला आहे.

हेही वाचाः- पंचतारांकित हॉटेलमधील पबवर पोलिसांची कारवाई, बड्या सेलिब्रिटींवर कारवाई

अँण्टाप हिलच्या ट्रान्झिस कॅम्प मध्ये दर्जाहिन गुटखाची साठवणूक केली असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी FDAला मिळाली होती. त्यानुसार FDAने २१ डिसेंबरला त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत FDAने एकाला या गुटख्याची विक्री करताना रंगेहाथ पकडले आहे. FDAने हा सर्व साठा जप्त केला असून त्याची किंमत १२ लाख ९१ हजार हजाराच्या आसपासा असण्याची शक्यता FDAच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. जप्त केलेल्या गुटख्यातील पाकिटांमधून १८ नमुने हे फाँरेन्सिकला तपासणीसाठी पाठवले असल्याचे FDAकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी संबधित व्यक्तीवर अँण्टाँप हिल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा