मोबाईल चोराला रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 Kurla Railway Station
मोबाईल चोराला रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कुर्ला रेल्वे पोलिसांनी एका मोबाईल चोराला गुरुवारी संध्याकाळी बेड्या ठोकल्या आहेत. मुजीब दाऊद शेख (55) असं या आरोपीचे नाव असून, तो गेल्या 40 वर्षांपासून चोऱ्या करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे या चोराला जेव्हा पकडलं जायचं तेव्हा तो आपली ओळख मोठमोठ्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी असल्याचे सांगत असे. गुरुवारी संध्याकाळी कुर्ला आरपीएफचा जवान सीएसटी लोकलने कुर्ल्याला जात असताना या आरोपीने त्याचा मोबाईल चोरला. जेव्हा या जवानाला हे समजलं तेव्हा त्याने त्याला पकडून कुर्ल्याच्या रेल्वे पोलीस ठाण्यात आणलं असता हा सगळा प्रकार उघडकीस आला. आरोपीकडून 5 मोबाईल आणि एक चाकू पोलिसांनी हस्तगत केला आहे.

विशेष म्हणजे या आरोपीनं आपल्यावर रेल्वे पोलिसांनी गुन्हा जरी दाखल केला तरी आपण त्याच दिवशी बाहेर असू असं धक्कादायक वक्तव्य केलंय.

Loading Comments