रस्ता की दारूड्यांचा अड्डा ?


रस्ता की दारूड्यांचा अड्डा ?
SHARES

मुलुंड - रस्ता की दारुड्यांचा अड्डा असं चित्र सध्या मुलुंड पूर्व-पश्चिम पादचारी पुलाला जोडणाऱ्या रस्त्यावर पाहायला मिळतंय. या रस्त्यावर रात्री साधारण 11 वाजल्यानंतर अनेक दारुडे मद्य पिण्यासाठी इथं जमतात. हे दारुडे अंधार व्हावा म्हणून कित्येकदा रस्त्यावरचे दिवे फोडतात. तसंच तिथे मोठ्या अवजड बस पार्क केले जात असल्यानं बसच्या आडोश्याला हे दारुडे आपली मैफिल रंगवत असतात. या रस्त्याच्या आसपास अनेक इमारती आहेत. तेथील स्थानिकांना याचा प्रचंड मनस्ताप होतोय. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून देखील हे अत्यंत घातक आहे. या दारुड्यांचा त्वरित बंदोबस्त झाला पाहिजे अशी मागणी येथील दुकानदार तसेच इथले रहिवासी करत आहेत.

संबंधित विषय