...आणि तरीही तो वाचला !


SHARES

मानखुर्द - एका युवकाने लोकल ट्रेन खाली येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 8 जानेवारी संध्याकाळी 5 वाजून 48 मिनिटांची ही घटना आहे. उडी मारल्यानंतर तरुण हा पहिल्यांदा ट्रेनच्या पुढच्या भागाला धडकला. त्यानंतर तो ट्रेनखाली गेला. तुम्हाला वाटेल की हा तरूण वाचला नसेल. पण, सुदैवाने या तरुणाचे प्राण वाचलेत. प्लॅटफॉर्मवर घडलेल्या या सर्व प्रकारानंतर घबराटीचं वातावरण पसरलं. हा सगळा प्रकार प्लॅटफॉर्मवर असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला. या जखमी तरूणावर राजावाडी रुग्णालयात उपचार सूरू आहेत. त्याने केलेला हा आत्महत्येचा प्रयत्न नेमका का, कशासाठी याचा तपास सध्या रेल्वे पोलीस करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा