पूर्व द्रुतगती मार्गावर चार गाड्या एकमेकांवर आदळल्यानं अपघात होऊन मोठी वाहतूक कोंडी झाली. एका कारने अचानक ब्रेक लावल्याने मागे अालेल्या ३ कार अाणि टेम्पो पुढील वाहनांवर अादळला. या विचित्र अपघाताने पूर्व द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सुदैवाने या अपघातात कसलीही जीवीतहानी झाली नाही.
सोमवारी दुपारी पूर्व द्रुतगती मार्गावर वेगात असलेल्या कारने अचानक ब्रेक लावला. त्यापाठोपाठ वेगात असलेल्या कारचालकांना उसंत न मिळाल्याने एका मागोमाग ३ कार अादळल्या. तर त्यापाठोपाठ अालेला टेम्पोही पुढील कारवर अादळला. या अपघातामुळे पूर्व द्रुतगतीवर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या वाहतूकीवर परिणाम झाला. वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक संथ गतीने मार्गक्रमन करीत होती.
हेही वाचा -
26/11 स्पेशल: सुरक्षेतील सुस्तपणा धोक्याचा!
चाइल्ड पाॅर्नोग्राफी बघाल, तरी ५ वर्षे तुरूंगात जाल!