आरे कॉलनीत हेलिकॉप्टर कोसळून पायलटचा मृत्यू


SHARES

गोरेगाव - गोरेगाव भागातील आरे कॉलनीत रविवारी दुपारी १२ वाजता एक हेलिकॉप्टर कोसळले. रॉयल पामजवळ ही दुर्घटना घडली. त्यात पायलटचा मृत्यू झाला असून तिघे जखमी आहेत. प्रफुल्लकुमार मिश्रा (52) असे मृत झालेल्या पायलटचे नाव आहे.
हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्याला आग लागली आणि परिसरात धुरं पसरला. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन हेलिकॉप्टरमधून चौघांना बाहेर काढलं. त्यानंतर अग्निशमन दलानं चौघांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान चौघांपैकी एकाचा मृत्यू झाला. तर रितेश मोदी, वृंदा मोदी आणि संजीव शंकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातात हेलिकॉप्टर पूर्णपणे जळून खाक झालंय. फक्त आता त्याचे अवशेष उरलेत.
कोसळलेलं हेलिकॉप्टर जुहू एअर बेसवरुन दुपारी 12 च्या सुमारास निघालं होतं. जॉय राईडसाठी हेलिकॉप्टर ठाणे परिसरात गेलं होतं. ठाण्यावरून परतत असताना रॉयल पामजवळ हे हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेमागचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा