नवी मुंबईत हायअलर्ट, उरणच्या पुलावर अतिरेक्यांची धमकी?

उरण तालुक्यामध्ये ओएनजी, नौसेनेचं शस्त्रागर, जेएनपीटी बंदर आदी महत्त्वाची ठिकाणे आहेत. ही ठिकाणे अतिसंवेदनशील असल्याने पोलीस कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाहीत. त्यामुळे पोलिसांनी येथील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

नवी मुंबईत हायअलर्ट, उरणच्या पुलावर अतिरेक्यांची धमकी?
SHARES

 नवी मुंबईत उरणजवळील एका पुलाच्या खांबावर अतिरेकी संघटना आयसिस आणि अतिरेकी अबू बकर अल बगदादीचा उल्लेख करत एक संदेश लिहिल्याचं आढळलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संदेश आढळल्यानंतर पोलिसांकडून परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणची सुरक्षा आणखी कडक करण्यात आली. नवी मुंबईत हाय अलर्टही जारी करण्यात आला आहे. 


सुरक्षा वाढवली 

हा संदेश कोणी लिहिला आहे याचा तपास अद्याप लागला नाही. हा संदेश समोर आल्यावर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसराची सुरक्षा वाढवली आहे. या संदेशात धोनी जन्नत मे आउट, आम आदमी पार्टी, केजरीवाल, हाफिज सऊद, रहिम कटोरी, राम कटोरी असं लिहिलं आहे. त्याचबरोबर देवनागरी आणि इंग्रजीमध्ये सांकेतिक आकडेही लिहिले आहेत. 


नाकाबंदी सुरू

उरण तालुक्यामध्ये ओएनजी, नौसेनेचं शस्त्रागर, जेएनपीटी बंदर आदी महत्त्वाची ठिकाणे आहेत. ही ठिकाणे अतिसंवेदनशील असल्याने पोलीस कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाहीत. त्यामुळे पोलिसांनी येथील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. या ठिकाणी नाकाबंदीही केली जात आहे. 



हेही वाचा -

निवृत्त एसीपीची पिस्तुल चोरणाऱ्यांना अटक

क्षुल्लक कारणांवरून अॅण्टाॅप हिलमध्ये एकाची हत्या




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा