निवृत्त एसीपीची पिस्तुल चोरणाऱ्यांना अटक

चोरांनी तिजोरीतून वडिलांची परवाना धारक पिस्तुल ही चोरल्याचे पाहिले. त्या पिस्तुलीचा दुरूपयोग होऊ नये या उद्देशानॆ करंजे यांनी सायन पोलिसात तक्रार नोंदवली.

निवृत्त एसीपीची पिस्तुल चोरणाऱ्यांना अटक
SHARES
मुंबईच्या सायन परिसरात राहणाऱ्या निवृत्त एसीपीच्या घरी दरोडा टाकत, दरोड्यात हाती लागलेल्या पिस्तुलीच्या धाकावर नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा सायन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. संतोष ऊर्फ जय प्रदीप संभरकर (३१), बाबू जमालुद्दीन खान(३५) व गणेश उर्फ मामा वैद्य(४७) अशी अटक आरोपींची नावं आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.


लिफ्ट दुरूस्तीचं काम

मानखुर्द परिसरात राहणारा संतोष संभरकर हा लिफ्ट दुरूस्तीचं काम करतो. हे काम करताना आसपासच्या इमारतीत कुठल्या खोल्या रिकाम्या आहेत, त्याची माहिती तो बाबू खानला द्यायचा. त्यानंतर हे तिघं संबंधित ठिकाणी दरोडा टाकायचे. काही दिवसांपूर्वी सायन परिसरात राहणारे किर्तीकुमार करंजे (५१) यांच्या घरी या टोळीने चोरी केली. त्यावेळी चोरट्यांनी तिजोरीतील १ लाख ८५ हजार रुपयांच्या दागिन्यांसह करंजे याच्या दिवंगत वडिलांची पिस्तुल आणि ४२ जिवंत काडतुसंही चोरली.


पोलिसांत तक्रार

करंजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं. तसंच, चोरांनी तिजोरीतून दिवंगत वडिलांची परवाना असलेली पिस्तुलही चोरल्याचं पाहिलं. कंरजे यांचे वडील निवृत्त एसीपी होते. या पिस्तुलीचा दुरूपयोग होऊ नये, म्हणून करंजे यांनी सायन पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानंतर, पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीनं आरोपींची ओळख पटवली. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक ललीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भागश्री मुळीक यांनी तपासाला सुरूवात केली. स्थानिक खबऱ्यांच्यामार्फत त्यांनी मिळालेल्या माहितीवरून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून जवळपास सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ती रिव्हॉल्वरचा परवाना करंजे यांच्या वडिलांच्या नावावर होता. त्यानंतर तो त्यांच्या नावावर करण्यात आला. या रिव्हॉल्वरमधील पीन काढण्यात आली होती. त्यामुळं त्याच्यापासून धोका नव्हता. परंतु, आरोपींनी इतरांना धाक दाखवण्यासाठी ती चोरल्याचं सांगितलं जात आहे. 



हेही वाचा -

यंदाचा पावसाळा मुंबईकरांसाठी दिलासा देणारा ठरेल - महापौर विश्वनाथ महाडेश्वर

घाटकोपरच्या पूलबंदीमुळं बेस्टचं लाखोंचं नुकसान



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा