क्षुल्लक कारणांवरून अॅण्टाॅप हिलमध्ये एकाची हत्या

मुंबईच्या अॅण्टाॅप हिल परिसरात एका ३८ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. आनंद नारायण असं या मृत व्यक्तीचं नाव असून अॅण्टाॅप हिल पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत एकाला ताब्यात घेतलं आहे.

क्षुल्लक कारणांवरून अॅण्टाॅप हिलमध्ये एकाची हत्या
SHARES

मुंबईच्या अॅण्टाॅप हिल परिसरात एका ३८ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. आनंद नारायण असं या मृत व्यक्तीचं नाव असून अॅण्टाॅप हिल पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत  एकाला ताब्यात घेतलं आहे.  

शाब्दीक वाद

धारावी परिसरात राहणाऱ्या आनंदचा टेम्पोचा व्यवसाय आहे. त्याच परिसरातील मारेकऱ्याला त्यानं काही दिवसांपूर्वी पैसे उधारीवर दिले होते. सोमवारी आनंद, फरार आरोपी आणि एक मित्र दारू पिण्यासाठी पॅटा गॅलक्सी बिल्डिंगच्या परिसरात बसले होते. दारूच्या नशेत दोघांची व्यवहारावरून शाब्दीक वाद झाला. हा वाद इतका विकोपाला पोहोचला की, आरोपीनं चाकूनं आनंदच्या गळ्यावर घातक वार करत पळ काढला.

उपचारादरम्यान मृत्यू

त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या तिसऱ्या मित्रानं रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आनंदला स्थानिक नागरिकांच्या मदतीनं सायन रुग्णालयात नेलं. मात्र उपचारादरम्यान आनंदचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या प्रकरणी अॅण्टाॅप हिल पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत एकाला ताब्यात घेतलं आहे. तर आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.हेही वाचा -

महालक्ष्मी रेसकोर्सजवळ भरधाव कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

प्रवेश प्रक्रिया नव्यानं राबवण्यात यावी, वैद्यकीय पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांची मागणीसंबंधित विषय