महालक्ष्मी रेसकोर्सजवळ भरधाव कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

मुंबईतील महालक्ष्मी रेल्वे स्टेशनजवळील महालक्ष्मी रेसकोर्स इथे भरधाव मर्सिडीज कारनं एका पादचाऱ्याला चिरडल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला

SHARE

मुंबईतील महालक्ष्मी रेल्वे स्टेशनजवळील महालक्ष्मी रेसकोर्स इथं भरधाव मर्सिडीज कारनं एका पादचाऱ्याला चिरडल्याची घटना घडली आहे. राजेंद्र प्रसाद राम (४३) असं या पादचाऱ्याचं नाव असून, या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 


जोरदार धडक

राजेंद्र प्रसाद राम हा अंधेरी इथं राहणारा असून तो ताडदेव इथं नोकरी करत होता. रात्री नेहमीप्रमाणं काम संपवून तो घरी जात होता. त्यावेळी मर्सिडीजनं त्याला जोरदार धडक दिली. ही कार हिरा व्यापारी ललित अदानी यांचा मुलगा चैतन्य चालवत होता. अचानक गाडीवरचा ताबा सुटल्यानं त्यानं राजेंद्रला चिरडलं. 


गुन्हा दाखल

त्याशिवाय, अपघातानंतर चैतन्यची गाडी महालक्ष्मी रेसकोर्सची संरक्षण भिंत तोडत रेसकोर्सच्या आवारात शिरली. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी आरोपी चैतन्यला अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.हेही वाचा -

रमजान ईदनिमित्त एसटीतील मुस्लिम अधिकाऱ्यांना लवकर पगार

प्रवेश प्रक्रिया नव्यानं राबवण्यात यावी, वैद्यकीय पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांची मागणीसंबंधित विषय
ताज्या बातम्या