सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सीस बॅकेत वळवल्या प्रकरणी फडणवीसांना न्यायालयाची नोटीस

पत्नीला बॅंकिग क्षेत्रात नावलौकिक मिळवून देण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा दुरउपयोग करून सरकारी कर्मचाऱ्यांची खाती ऍक्सिस बॅंकेत वळती केली

सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सीस बॅकेत वळवल्या प्रकरणी फडणवीसांना न्यायालयाची नोटीस
SHARES

पदाचा गैर वापर करून नियमांचे उल्लघंन करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी कर्मचाऱ्यांची पगाराची खाती अॅक्सीस बॅकेत काढली. याच बॅकेत फडणवीस त्यांची पत्नी अमृता फडणवीस उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. पदाचा गैरवापर केल्या प्रकरमी मोहनीश जबलपुरे यांनी फडणवीसांविरोधात याचिका करत, न्यायालयात आव्हान दिले. त्यानुसार न्यायालयाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह राज्याच्या मुख्य सचिवांनाही मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये देवेंद्र फडणवीसांना आठ आठवड्यात उत्तर देण्यास बजावले आहे. 

हेही वाचाः- ​जीडीपीत महाराष्ट्राची ५ स्थानावर घसरण​​​

 पत्नीला बॅंकिग क्षेत्रात नावलौकिक मिळवून देण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा दुरउपयोग करून सरकारी कर्मचाऱ्यांची खाती ऍक्सिस बॅंकेत वळती केली. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) ऍक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष आणि पश्चिम भारताच्या कॉर्पोरेट प्रमुख आहेत. या हस्तांतरणाचा फायदा  ऍक्सिस बँके ला झाला. मात्र, स्टेट बँकेला मोठा तोटा सहन करावा लागला. या प्रकरणी याचिका मोहनीश जबलपुरे (Mohanish Jabalpur) यांनी फडणवीसांविरोधात दाखल केली होती. 

हेही वाचाः- ​नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल अरबी समुद्राच्या तळातून शोधले​​​

गृहमंत्रालय अंतर्गत येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची खाती , संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची खाती आणि मंत्रालयीन घोटाळ्याची खाती देवेंद्र फडणवीस यांनी एक्सिस बॅंकेत वळवली होती. यामुळे या घोटाळ्याचे चोकशी करुन राज्य सरकारला कारवाईचे आदेश देण्यात यावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायायालयाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, अतिरिक्त पोलीस महासंचालक यांना प्रतिवादी करुन नोटीस बजावली आहे. तसेच येत्या आठ दिवसाच्या आत फडणवीस यांना उत्तर देण्याचे आदेश दिले आहे. ऍक्सिस बँक ही देशातील एक जबाबदार बँकिंग आणि वित्तीय संस्था आहे. सैन्य आणि पोलिस या दोन्ही गणवेशधारक दलांची सेवा करणे हे ऍक्सिस बँकेचं लक्ष्य तर आहेच, पण अभिमानास्पद बाबही आहे. आम्ही देश आणि राज्यांमध्ये गुंतवणूक करत राहू’ असे ऍक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक राजेश दहिया यांनी पत्रक काढून म्हटले होते.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा