सराईत मोबाइल चोरांना अटक


सराईत मोबाइल चोरांना अटक
SHARES

जीआरपी एसटीएफच्या कल्याण यूनिटने दोन सराइत चोरांना बेडया ठोकल्या आहेत. शावेज नाशिर खान (23) आणि बिलाल इकबाल शेख (21) अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून एसटीएफने तीन गुन्ह्यांचा छडा लावला आहे.



हे दोघेही रेल्वे स्थानकावर लोकलमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरी करण्यात पटाईत असून या याआधी देखील त्यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती जीआरपी एसटीएफने दिली आहे.

काही दिवसांपूर्वी हे दोघेही ठाणे रेल्वे स्थानकात चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती जीआरपीला मिळाली होती. त्यानंतर ठाणे स्थानकात पाळत ठेऊन या दोघांना पकडण्यात आले.

आतापर्यंत या दोघांकडून दोन मोबाइल फोन आणि प्रवाशांची चोरलेली पाकिटे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोघांकड़ून आणखीही गुन्ह्यांची उकल होईल, असा दावा जीआरपीने केला असून सध्या त्याचाच तपास सुरू आहे.



हेही वाचा - 

रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोबाईल चोर जेरबंद


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा