SHARE

परळ - भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईनंतर व्हॉट्सअॅप तसेच अन्य सोशल मीडियावर संदेशाचा महापूर आला आहे. भारतीयांकडून वेगवेगळ्या पद्धतीने भावना व्यक्त केल्या जात आहेत. तसेच 'भावना व्यक्त करताना समाजात कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण होणार नाही' याची काळजी घेणे आवश्यक आहे. 'भावना भडकवणारे कुठलेही संदेश प्रसारित करणे हा गुन्हा असून नागरिकांनी याचे भान ठेवावे' याशिवाय 'उरीतील हल्ल्यानंतर विविध ठिकाणी अतिरेकी शिरल्याच्या अफवांनाही उत आले आहे', 'अशा अफवांवर विश्वास न ठेवता याबाबतची खातरजमा पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडून घ्यावी', असे आवाहन ना. म. जोशी पोलिसांकडून केले जात आहे.

पोलीस नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक - २२६२१८५५/ २२६२१९८३/२२६२५०२०

संबंधित विषय
ताज्या बातम्या