हॉटेल व्यावसायिकाची मुलुंडमध्ये गोळी झाडून आत्महत्या


हॉटेल व्यावसायिकाची मुलुंडमध्ये गोळी झाडून आत्महत्या
SHARES

मुलुंडमधील मार्शल सिक्युरिटी आणि श्रेया हॉटेलचे मालक सतनाम सिंग यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

सतनाम मुलुंडच्या वसंत गार्डन येथील विलोज टॉवरच्या पंधराव्या माळ्यावर राहत होते. मागील अनेक दिवसांपासून व्यावसायात होत असलेल्या नुकसानामुळे ते मानसिक तणावात होते. याच नैराश्यातून त्यांनी सोमवारी दुपारी 12:30 च्या सुमारास घरातील बेडरूममध्ये स्वत:च्या परवाना धारक बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली.


पोलिसांचा तपास सुरू

गोळीचा आवाज ऐकून घरातल्यांनी बेडरूमच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात सतनाम पडलेले घरातल्यांना आढळून आले. घरातल्यांनी त्यांना तातडीने फोर्टीज रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात अपमृत्यूचू नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाहून एक रिकामी पुन्नळी, पिस्तुल आणि 5 जिवंत काडतूस जप्त केलं आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिस तपास करत आहेत.


हेही वाचा -

म्हणून महिलेने मालकालाच गंडवलं

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा