नवऱ्याकडून महिला पोलीस कॉन्स्टेबलवर हल्ला

कांदिवली - महिला पोलिसावर तिच्याच नवऱ्यानं चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. कांदिवलीतल्या सह्याद्रि सोसायटीच्या चौथ्या मजल्यावर महिला पोलीस योगिता सुर्वे राहत होती. महिलेच्या घरी घुसून तिचा नवरा प्रितम अहिरेकर यानं तिच्यावर चाकूनं हल्ला केला. कौटुंबिक वादातून हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. 2015मध्ये या दोघांचं लग्न झालं होतं. पण कौटुंबिक वादातून ते वेगळे राहत होते. मंगळवारी प्रितम तिच्या घरी घुसला आणि तिच्यावर हल्ला केला. योगितानं आरडाओरडा केला म्हणून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिला शताब्दी रुग्णालयात एडमिट केले. पोलिसांनी याप्रकरणी तिच्या नवऱ्याला अटक केलीय.

Loading Comments