डोंबिवली : पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या

आठ महिन्यांपूर्वी सुधाकर यादव यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती

डोंबिवली : पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
SHARES

डोंबिवली (dombivli) पश्चिमेतील भगवान काठेनगरमध्ये राहणाऱ्या पत्नीने मित्रांच्या मदतीने पतीचा मानसिक आणि शारीरिक छळ करून त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचे विष्णुनगर पोलिसांनी (vishnunagar police) केलेल्या तपासात उघड झाले आहे. आठ महिन्यांपूर्वी पतीने आत्महत्या (suicide) केली, तेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला होता.

सुधाकर यशवंत यादव (42) राहणार लीलाबाई म्हात्रे चाळ, भगवान काठे नगर, डोंबिवली असे मृत पतीचे नाव आहे. संजना सुधाकर यादव (31) असे आरोपी पत्नीचे नाव आहे.

संजनाने मोहम्मद शेख, महेश पाटील आणि अनोळखी व्यक्तीच्या मदतीने पतीचा मानसिक छळ केला. आरोपींनी त्याचा विविध प्रकारे छळ केला. आठ महिन्यांपूर्वी सुधाकर यादव यांनी पत्नी आणि तिच्या मित्रांच्या छळाला कंटाळून घरात एकटे असताना गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

बदलापूर येथे राहणारा सुधाकरचा भाऊ प्रभाकर यशवंत यादव याने डिसेंबर 2023 मध्ये विष्णुनगर पोलिस ठाण्यात आपल्या भावाच्या आत्महत्येबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने विष्णुनगर पोलिसांनी कसून तपास केला. या तपासात सुधाकरचा पत्नी संजना आणि आरोपी मित्राकडून छळ होत असल्याचे समोर आले.

या त्रासाला कंटाळून सुधाकर यादव यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या तपासानंतर विष्णुनगर पोलिसांनी पत्नी संजना हिच्यासह तिच्या आरोपी मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जी.बी.देवरे यांनी केला.



हेही वाचा

दादर : तुतारी एक्स्प्रेसमध्ये बॅगेत भरलेला मृतदेह आढळला

वांद्रे ते वेलंकनी दरम्यान विशेष ट्रेन धावणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा