धक्कादायक! नवऱ्याने केला अनैसर्गिक सेक्स, सासू, नणंदेनं केलं चित्रीकरण


धक्कादायक! नवऱ्याने केला अनैसर्गिक सेक्स, सासू, नणंदेनं केलं चित्रीकरण
SHARES

पतीनं जबरदस्तीनं अनैसर्गिक सेक्स केला आणि सासू तसेच नणंदेनं त्याचा व्हिडिओ काढल्याची तक्रार एका पीडित विवाहितेने बांगूर नगर पोलीस ठाण्यात नोंदवल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे चित्रीकरण सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देखील महिलेला देण्यात आल्याचं तिने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी बांगूर नगर पोलीस ठाण्यात नवऱ्यासह सासू आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आधीही दोन लग्न

तीस वर्षांची पीडित महिला बांगूर नगर परिसरात राहत असून ३५ वर्षीय नवरा तिच्यावर लग्न झाल्यापासूनच मानसिक तसेच शारीरिक अत्याचार करत असे. सुरूवातीला या महिलेने दुर्लक्ष केलं; पण जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जायला लागली, तेव्हा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यावाचून तिच्याकडे पर्याय राहिला नाही.  

एवढंच नाही, तर आपल्या नवऱ्याची आधीही दोन लग्न झालेली असून त्याने आपली घोर फसवणूक केली आहे. शिवाय त्याने जबरदस्तीनं गर्भपात करायला लावल्याचं देखील तिने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.


'या' कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद

या प्रकरणी नवरा, सासू आणि नणंदेविरोधात ४९८ (अ)  घरगुती हिंसा, ३७७ अनैसर्गिक संभोग, २९२, ४९४ (दुसरं लग्न), ४९५ (लग्न झाल्याचं लपवणं ), ४९६(चुकीच्या पद्धतीने लग्न करणं ) ३२३ (मारहाण) ५०४ (शिवीगाळ)  आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसून तपास सुरु असल्याची माहिती बांगूर नगर पोलिसांनी दिली आहे.हेही वाचा

पल्लवी पुरकायस्थचा मारेकरी दीड वर्षांनी गजाआड

रॅगिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर केला व्हायरल, आरोपींवर गुन्हा दाखल

स्पायडरमॅन टोळी अडकली जाळ्यात!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय