रॅगिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर केला व्हायरल, आरोपींवर गुन्हा दाखल


SHARE

दादरमधील नावाजलेल्या आर्किटेक्चर महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी रॅगिंग केल्याप्रकरणी सात विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी महाविद्यालयाने अंतर्गत चौकशी केल्यानंतर दादर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.


अशी केली रॅगिंग

महाविद्यालयाचा वार्षिक कार्यक्रम सुरू असताना सात आरोपी विद्यार्थ्यांनी या तरुणीचा फोटो हातात धरून 'शूट आउट अॅट वडाळा' या चित्रपटातील आयटम साँगनर डान्स केला होता. त्यानंतर तो व्हिडीओ स्नॅप चॅटवर टाकला होता.

त्यानंतर ऑगस्ट महिन्यात तरुणीच्या वर्गाला एक ग्रुप असाइनमेंट देण्यात आला होता. त्यावेळी ही तरुणी देखील आरोपी विदयार्थ्यांच्या गृपमध्येच होती. असाइनमेंट दरम्यान एका ठिकाणी जमायचे ठरलेले होते. मात्र दुर्दैवाने तरुणीला पोचण्यास उशीर झाला. इतर विद्यार्थ्यांनी या असाइनमेंटमध्ये त्या तरुणीचे नाव समाविष्ट करण्यास नकार दिला आणि तिला डान्स करण्यास भाग पाडले. या डान्सचा व्हिडिओ काढून रॅगिंग या नावाने व्हाट्सअॅप ग्रुपवर अपलोड केले. एकाने मुलीचे फोटो मॉर्फ केल्याचे देखील समजते. हे सगळे महाविद्यालयात व्हायरल झाल्याने मुलगी निराश झाली आणि ती महाविद्यालयात जाणे टाळू लागली. तिच्या घरच्यांनी तिला विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयात तक्रार केली. या प्रकरणी महाविद्यालयाने समिती स्थापन करून चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला.

या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 354, 509, 500 आणि 34 सह महाराष्ट्र रॅगिंग विरोधी कायदा कलम 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दादर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांनी दिली आहे.


हेही वाचा - 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अहवाल द्या- राज्यमंत्री


संबंधित विषय