रॅगिंगला आळा घालण्यासाठी युजीसीचा प्रयत्न

 Mumbai
रॅगिंगला आळा घालण्यासाठी युजीसीचा प्रयत्न
Mumbai  -  

मुंबई - बड्या कॉलेजेमध्ये घडणारे रॅगिंगचे प्रकार थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना लवकर करण्यात याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे युजीसीने लघुपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये समूपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी युजीसीने चार लघुपट आणि एक माहितीपट बनवला आहे. रॅगिंग हा दखलपात्र गुन्हा असल्यामुळे रॅगिंगचे प्रकार रोखण्यासाठी युजीसीने अधिनियम तयार केलेले आहेत. या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देशभरातील सर्व विद्यापीठांना देण्यात आलेले आहेत.

रॅगींग संदर्भात जनजागृती करणारे चार लघुपट आणि एक माहितीपट हे रॅगिंगवर जनजागृती करणारे रॅगिंगच्या दुष्परीणांमाची माहिती देणारे आहेत. Ugc.ac.in/page/videos-Regarding-Ragging.aspx या वेबसाईटवर टाकण्यात आले आहेत. यूजीसीच्या या अधिनियमांची अंमलबजावणी न झाल्यास यूजीसीकडून महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा यूजीसीकडून देण्यात आला आहे.

Loading Comments