चुकीचे मेसेज न पाहता पुढे पाठवणे पडू शकतं महागात

महामारीला धार्मिक रंग देऊन समाजात अशांतता पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या पोस्ट्स ,मेसेजेस कोणताही सारासार विचार न करता फॉरवर्ड केल्या जात आहेत.

चुकीचे मेसेज न पाहता पुढे पाठवणे पडू शकतं महागात
SHARES

लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही व्यक्ती परिस्थितीचा गैरफायदा घेत, सोशल मिडियावर अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सोशल मिडियावर चुकीचे मेसेजेस फिरत आहेत. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे.

हेही वाचाः- ठाणे महापालिकेची ‘ऑनलाइन बेड अलोकेशन सेवा’

त्यात प्रामुख्याने व्हाट्सअँपवर अफवा पसरविणारे चुकीचे मेसेजेस ,फोटोज ,व्हिडिओज ,चुकीच्या पोस्ट्स पाठवून , तसेच महामारीला धार्मिक रंग देऊन समाजात अशांतता पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या पोस्ट्स ,मेसेजेस कोणताही सारासार विचार न करता फॉरवर्ड केल्या जात आहेत. त्यावर सायबर पोलिसांकडून गुन्हे नोंदवले जात आहे.  राज्यात सायबर संदर्भात ५२८  गुन्हे दाखल झाले असून २७३ व्यक्तींना अटक केली आहे.  ज्यापैकी ४१ N.C आहेत. आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९९ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी २२२  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, tiktok विडिओ शेअर प्रकरणी २८ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी १४ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, Youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ६१ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २७३ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०८ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे .

 हेही वाचाः-मुंबईत आतापर्यंत ३ लाख ६४ हजार कोरोना चाचण्या

तुम्ही व्हाट्सअँप ग्रुपचे सदस्य असाल तर काय करावे 

चुकीच्या /खोट्या बातम्या,द्वेष निर्माण करू शकणारी भाषणे व अशा प्रकारची माहिती ग्रुपवर पोस्ट करू नये . आपल्या ग्रुपमधील जर अन्य कोणी सदस्याने अशी माहिती त्या ग्रुपवर पाठविली तर ती आपण अजून पुढे कोणालाही पाठवू नये. जर आपण सदस्य असणाऱ्या ग्रुपवर काही खोटी, चुकीची, आक्षेपार्ह बातमी , व्हिडिओज  मेमे किंवा पोस्ट्स येत असतील की ज्यामुळे जातीय किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतात ,अशा पोस्ट्सबद्दल सदर ग्रुप ऍडमिनला सांगून तुम्ही  नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करू शकता तसेच त्याची माहिती www.cybercrime.gov.in या  संकेतस्थळावर (website ) पण देऊ शकता.

 ग्रुप ऍडमिन, ग्रुप निर्माते (creator) असाल तर काय करावे ?

 ग्रुप स्थापन करताना प्रत्येक ग्रुप सदस्य (member) हा एक जबाबदार व विश्वासार्ह व्यक्ती आहे याची खात्री करूनच त्याला किंवा तिला ग्रुपमध्ये सामील करावे.  ग्रुपमधील सर्व सदस्यांना ग्रुप निर्माण करायचा उद्देश व ग्रुपची नियमावली समजावून सांगावी.  ग्रुपवर शेअर होणाऱ्या पोस्ट्सचे नियमितपणे परीक्षण करा.  परिस्थिती अनुसार गरज पडल्यास ग्रुप सेटिंग बदलून only admin असे करावे, जेणे करून अनावश्यक मेसेज ग्रुपवर टाळता येतील. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा