आयआयटी बॉम्बेमधील सायकल कुणी पळवली? हे कळाल्यावर तुम्हीही थक्क व्हाल


आयआयटी बॉम्बेमधील सायकल कुणी पळवली? हे कळाल्यावर तुम्हीही थक्क व्हाल
SHARES

आतापर्यंत कुणी एखादा अशिक्षित किंवा गर्दुल्ला चोरी करत असल्याचे साहजिकच आपण ऐकले असेल. पण विद्येचा दाता शिक्षकच चोरी करत असेल तर... नक्कीच तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण असाच प्रकार जगातील नामांकित तंत्रशिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवईच्या आयआयटी बॉम्बेमध्ये उघडकीस आला आहे. येथील सायकल चोरीची केस पवई पोलिसांनी सोडवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका इंजिनियरला अटक केली असून हा इंजिनियर पवई आयआयटीमध्ये लेक्चरर म्हणजेच प्राध्यापक असल्याचं समजतं. आतापर्यंत पवई पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल ७ सायकली जप्त केल्या आहेत. सायकल चोरी करून प्राध्यापक त्यांना ओएलएक्सवर विकत असे.


सात सायकलींची चोरी

गेल्या काही दिवसांपासून पवईच्या आयआयटी कॅम्पसमध्ये सायकल चोऱ्यांचे प्रमाण वाढलं होतं. कित्येक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या सायकली चोरी झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. आयआयटीचा कॅम्पस हा मोठा असल्याने बऱ्याच विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी सायकलीला पसंती दिली होती.

पाच ऑक्टोबरला आयआयटीत शिकणाऱ्या २५ वर्षीय विद्यार्थिनीची महागडी सायकल चोरीला गेली होती. सायकल चोरीचे बरेच प्रकरण कॅम्पसमध्ये झाल्याने पवई पोलिसांची कॅम्पसवर करडी नजर होतीच, त्यातच १६ तारखेला एक संशयित व्यक्ती सायकल चोरी करत असल्याची खबर पवई पोलिसांना मिळाली. त्यानुसार पवई पोलिसांचं एक पथक आयआयटी कॅम्पसमध्ये दाखल झालं आणि या आरोपीला अटक करण्यात आली.


का करायचा सायकलींची चोरी?

त्याच्या चौकशीत आयआयटी कॅम्पसमधील सायकल चोरीमागे त्याचाच हात असल्याचे उघड झाले. आतापर्यंतच्या चौकशीत पवई पोलिसांनी आरोपीकडून तब्बल ७ सायकल जप्त केल्या आहेत. आरोपीने पीएचडीसाठी जानेवारी महिन्यात नोकरी सोडल्याचे समजतं.  


सदर आरोपी हा आयआयटीत लेक्चरर असून आपल्या सोबत तो एक डुप्लिकेट चावी घेऊन वावरत असे, ही चावी तो कॅम्पसमध्ये उभ्या असलेल्या सायकलला लावून बघत असे. चावीने सायकलचं लॉक उघडल्यानंतर तो सायकल घेऊन फरार होत असे, त्यानंतर अशा चोरीच्या सायकलींना ओएलएक्सवर विकत असे

- अनिल पोफळे, पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा