मालाडमध्ये शेकडो लिटर ताडी जप्त

 Madh Island
मालाडमध्ये शेकडो लिटर ताडी जप्त
मालाडमध्ये शेकडो लिटर ताडी जप्त
See all

मालाड - पालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर अबकारी विभागातील पथकाने बनावट देशी दारू आणि अनधिकृतरित्या ताडीची विक्री होणाऱ्या ठिकाणांवर छापेमारी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मालाड (प.) इथल्या मढ आयलंड आणि मढ जेट्टी या ठिकाणी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ताडीची तस्करी सुरू असल्याची माहिती अबकारी विभागाला मिळाली होती. याची माहिती मिळताच रविवारी पहाटे चारच्या सुमारास अबकारी पथकाने मढ आयलंडच्या पास्कलवाडीत छापे टाकत ताडीसह दोघांना अटक केली.

अबकारी विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव वैद्य यांनी सांगितले की, मुंबईत ताडीवर बंदी आहे. त्यानंतरही इथे अवैधरित्या ताडीची तस्करी केली जात होती. उत्पादन शुल्क आयुक्त व्ही. राधा, सुनील चव्हाण आणि महेश झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही छापेमारी केली. यामध्ये 290 लिटर अवैध ताडी जप्त करत दोघांना अटक केली.

Loading Comments