धक्कादायक! पोलिओ ऐवजी पाजले सेनिटायझर,१२ मुलं रुग्णालयात

बाधित मुलांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वाचा कुठली आहे ही घटना...

धक्कादायक! पोलिओ ऐवजी पाजले सेनिटायझर,१२ मुलं रुग्णालयात
SHARES

महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील गावात पोलिओच्या डोस देण्याऐवजी १२ मुलांना सॅनिटायझरचे थेंब देण्यात आले आहेत. सोमवारी एका अधिकाऱ्यानं याबद्दल माहिती दिली.

जिल्ह्यातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, बाधित मुलांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथं त्यांची प्रकृती स्थिर आहे. सर्व मुलं पाच वर्षाखालील होते. अशा चुकिसाठी तीन आरोग्य कर्मचार्‍यांवर कारवाई केली जाईल.

अधिकाऱ्यानं हे पण सांगितलं की, ही घटना कापसीकोपरी गावातल्या भानबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली आहे. इथं १ ते ५ वर्षांच्या मुलांसाठी पोलिओ लसीकरण कार्यक्रम चालवला जात आहे.

यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या १२ मुलांना पोलिओ थेंबऐवजी दोन थेंब सॅनिटायझर देण्यात आले. मुलांना उलट्या आणि अस्वस्थतेची तक्रार सुरू झाली.

त्यांनी सांगितलं की, ज्या मुलांना सॅनिटायझरचे थेंब देण्यात आले होते त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. सर्व मुलांची स्थिती स्थिर आहे आणि त्यांचे परीक्षण केलं जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार घटनेच्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात एक डॉक्टर, एक अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्ता उपस्थित होते. तपास सुरू करण्यात आला असून तिन्ही आरोग्य कर्मचार्‍यांना निलंबित केलं जाईल.



हेही वाचा

राज्यात ५३१ केंद्रच्या माध्यमातून ७७ टक्के कोरोना लसीकरण

३६ हजार कर्मचाऱ्यांना लस; आतापर्यंत १ लाख २५ हजार कर्मचाऱ्यांनी केली नोंदणी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा