राॅयल्टीच्या नावाखाली कलाकारांचे शंभर कोटी बुडवल्याप्रकरणी यशराज फिल्मसवर गुन्हा दाखल

कलाकारांकडून राँयल्टीचे पैसे जमा केले. माञ ते पैसे आरपीआरएसमध्ये जमा न करता. ते पैसे स्वत:च्या फायद्यासाठी वापरले.

राॅयल्टीच्या नावाखाली कलाकारांचे शंभर कोटी बुडवल्याप्रकरणी यशराज फिल्मसवर गुन्हा दाखल
SHARES


गीतकार, संगीतकार, गायक आणि संगीत निर्माता यांचे शंभर कोटी हडप केल्याप्रकरणी  बॉलिवूड प्रॉडक्शन हाऊस असलेल्या यश राज फिल्म्सवर मुंबई पोलिसांंच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसायटीने (आयपीआरएस) हा गुन्हा दाखल केला आहे. 

आयपीआरएस हि संस्था गीतकार, संगीतकार, गायक आणि संगीत निर्माता यांचे प्रतिनिधित्व करते. कलाकारांचे राँल्टीचे पैसे जमा करण्याचे काम आयपीआरएसला देण्यात आले असताना. यश राज फिल्म्सने त्याच्या साल 2012 ते आतापर्यंतच्या चिञपटासाठी ज्या ज्या कलाकारांसोबत काम केले. त्या कलाकारांकडून राँयल्टीचे पैसे जमा केले. माञ ते पैसे आरपीआरएसमध्ये जमा न करता. ते पैसे स्वत:च्या फायद्यासाठी वापरले. अशा प्रकारे यशराज फिल्म्सने 100 कोटी रुपये हडप केल्याची तक्रार आरपीआरएसने पोलिसात नोंदवली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा गुन्हा  आर्थिक गुन्हे  शाखेच्या पोलिसांकडे वर्ग केला.

त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यशराज फिल्म्स विरोधात भा. दं. वि. कलम ४०९, ३४ आणि कॉपीराईट्स ऍक्टमधील काही कलमांअन्वये हा गुन्हा दाखल केला आहे. आरपीआरएसच्या वरिष्ठ व्यवस्थापक शितल मदनानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला असून तक्रारीत निर्माता संचालक उदय चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा