पाणपोईवर पोलिसांचे अतिक्रमण?


पाणपोईवर पोलिसांचे अतिक्रमण?
SHARES

गिरगाव - ब्रिटीशकालीन 135 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पाणपोईवर पोलिसांनी अतिक्रमण केल्याचा आरोप नागरिकांनी केले आहे. व्ही. पी. रोडवर बांधण्यात आलेल्या पाणपोईच्या शेजारी पोलीस स्टेशन अाहे. पावसापासून वास्तूचे रक्षण व्हावे यासाठी त्याला चारही बाजूने बंद करून ठेवण्यात आले असून त्याच ठिकाणी पोलीस ठाण मारून बसले आहेत. या ठिकाणी वाचनालय उघडावे अशी मागणी स्थानिकांनी केली होती. मात्र पोलिसांनी अतिक्रमण केल्याने स्थानिक रहिवाशांनी तक्रार केली आहे. तसेच प्रशासनाने हे अतिक्रमण लवकरात लवकर हलवावे अशी मागणीही स्थानिकांनी केली आहे.

पाणपोई रहिवाशांकडून आजगायत जतन करून ठेवण्यात आली. घोड्यांना पाणी पिता यावे या उद्देशाना ही पाणपोई बांधण्यात आली होती. त्यानुसार परिसराचे नाव दोन टाकी ठेवण्यात आले. नतंर ती पाणपोई बंद जरी असली तरी एेतिहासिक स्थळ म्हणून पर्यटक भेट देत होते.

संबंधित विषय