आयपीएलवर सट्टा खेळणाऱ्या तिघांना अटक

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या तिघांना दादर पोलिसांनी अटक केली. संजय लपासिया, रमेश गंगणे, उत्तम जैन अशी या सट्टेबाजांची नावे आहेत. या सट्टेबाजांकडून २० मोबाइल फोन, २५ सिमकार्ड, १ दूरचित्रवाणी संच आणि एक लॅपटॉप आदी साहित्य जप्त केले आहे.

आयपीएलवर सट्टा खेळणाऱ्या तिघांना अटक
SHARES

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या तिघांना दादर पोलिसांनी अटक केली.  संजय लपासिया, रमेश गंगणे, उत्तम जैन अशी या सट्टेबाजांची नावे आहेत. या सट्टेबाजांकडून २० मोबाइल फोन, २५ सिमकार्ड, १ दूरचित्रवाणी संच आणि एक लॅपटॉप आदी साहित्य जप्त केले आहे. या सर्वांची किंमत एक लाख रुपये आहे. हे सट्टेबाज शुक्रवारी झालेल्या कोलकाता नाईट रायडर आणि दिल्ली कॅपिटल या सामन्यावर सट्टा खेळत होते.


घरातून सट्टा

दादरच्या एका उच्चभ्रू वस्तीत आरोपी संजय लपासिया हा राहतो. याच्याच घरी हे सट्टेबाज आयपीएलवर पैसे लावत होते. संजयसोबत रमेश गंगणे आणि उत्तम जैन हे देखील होते. याबाबतची माहिती दादर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी लपासियाच्या घरावर कारवाई केली. यावेळी सट्टा लावत असताना या तिघांना पोलिसांनी रंगेहात अटक केली.  न्यायालयाने तिघांना पोलिस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा - 

बलात्कार प्रकरणातील ४ आरोपींना २० वर्षांचा सश्रम कारावास

मुलांधील पब्जीच्या वेडाला पालकच जबाबदार, उच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा