बलात्कार प्रकरणातील ४ आरोपींना २० वर्षांचा सश्रम कारावास

ठाणे सत्र न्यायालयानं २०१६ साली झालेल्या बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. चार आरोपींना २० वर्षे सश्रम कारावस तर अन्य एका आरोपीला १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीआहे.

SHARE

ठाणे सत्र न्यायालयानं २०१६ साली झालेल्या बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. चार आरोपींना २० वर्षे सश्रम कारावस तर अन्य एका आरोपीला १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीआहे. याव्यतिरिक्त ४ आरोपींना २० हजार आणि ५ व्या आरोपीवर १० हजारांचा दंड ठोठावला आहे. या घटनेचे पडसाद विधानसभेतही दिसले होते.

पीडिता मानसिक रूग्ण

८ जानेवारी २०१६ रोजी रात्री पीडितेच्या आईनं एका कामासाठी तिला बाहेर पाठवलं. परंतु ती मुलगी आपल्या बहिणीच्या शेजाऱ्याच्या घरात पोहोचली. ती मुलगी मानसिक रूग्ण असल्याची माहिती पीडितेच्या वकील उज्ज्वला महोलकर यांनी दिली. या प्रकरणात दोषी ठरलेला फळ विक्रेता गोपी बोरा, रिक्षा चालक बालाजी आणि त्याचे मित्र राजेश मौर्या, कमलेश आणि विजय बहादूर लोकमान्य नगर आणि सावरकर नगरचे रहिवासी आहेत. दरम्यान, या पाचही आरोपींनी तिला एका जागी नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

 

विधानसभेतही गाजला मुद्दा

पीडित मुलगी आपल्या घरी पोहोचल्यानंतर तिने  हावभाव करून आपल्या आईला घडलेल्या घटनेती माहिती दिली. त्यानंतर मुलीची परिस्थिती पाहून तिच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. गोपी बोराविराधात बलात्कार आणि अन्य आरोपींविरोधात सामुहिक बलात्कार, अपहरण आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकणाचे पडसाद विधानसभेतही पहायला मिळाले होते. त्यानंतर गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात वर्ग करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर न्यायालयानं आता चार आरोपींना २० वर्षांचा सश्रम कारावास आणि एका आरोपीला १४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.हेही वाचा -

बँकेच्या ड्रॉप बॉक्समधून ४६ लाखांच्या चेकची चोरी; एकाला अटक

कुर्ला स्थानकावरील 'त्या' लिबू सरबत विक्रेत्याला ५ लाखांचा दंड
संबंधित विषय
ताज्या बातम्या