आयपीएस अधिकारी शिवदीप लांडेंचं फेसबुक खाते हॅक

फेसबुकवर लांडे यांचे साडेसात लाख फॉलोअर आहेत. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) शिवदीप लांडे हे पोलिस उपमहानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.

आयपीएस अधिकारी शिवदीप लांडेंचं फेसबुक खाते हॅक
SHARES

पोलिस दलामध्ये सिंघम अधिकारी म्हणून ओळख असलेले एटीएसचे पोलिस उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. लांडे यांनीच समाजमाध्यमांवरून याबातची माहिती दिली आहे.

फेसबुकवर लांडे यांचे साडेसात लाख फॉलोअर आहेत. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) शिवदीप लांडे हे पोलिस उपमहानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. पोलिस दलातील धडाकेबाज कारवाईमुळे लांडे नेहमीच चर्चेत असतात. समाजमाध्यमांवरही लांडे यांचे लाखो फॉलोअर आहेत. 

 लांडे यांनी म्हटलं की, माझे अधिकृत फेसबुक पेज हॅक झाले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी माझे पेज हॅक केले आहे. माझ्या पेजचे अॅडमिन मनजित विशाल हे आहेत. माझे पेज 19 ऑगस्टला हॅक झाले. हॅकरनी विशाल यांना अॅडमिन म्हणून काढून टाकले आहे. आता माझे पेज फेसबुकवर दिसत नाही. 

आपल्या नावाचा वापर करून कोणीही फेसबुक मित्रांची दिशाभूल करू नये किंवा कुणी आर्थिक फसवणूक करू नये, यासाठी लांडे यांनी समाजमाध्यमावरून याबाबतची माहिती दिली आहे. यासंदर्भात लांडे यांनी फेसबुककडे तक्रारही केली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा