पाळणाघरात तुमची मुलं सुरक्षित आहेत का?


SHARES

मुंबई - पाळणाघरात काम करणाऱ्या आयाने 10 महिन्याच्या चिमुकलीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना 24 नोव्हेंबरला नवी मुंबईच्या खारघरमध्ये घडली. चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी मारहाण करणारी आया आणि संचालिका यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर संचालिकेची जामिनावर सुटका झालीय. तर आयाला 14 दिवसांची न्यायालयिन कोठडी सुनावण्यात आलीय. या घटनेमुळे मुंबईकरांमध्ये घबराट पसरली आहे. यासंदर्भात दहिसरच्या गृहिणी संजना सावंत यांनी म्हटलं की, या घटनेनंतर मुलांना पाळणाघरात पाठवायचं की नाही याबाबात पालकांनी विचार करावा. ज्यांची मुलं पाळणाघरात आहेत ते ही घटना पाहून नक्कीच चिंतेत असतील.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा