अपघातात जॅग्वारचा चेंदामेंदा, चार जखमी

 Mumbai
अपघातात जॅग्वारचा चेंदामेंदा, चार जखमी

मरीन ड्राइव्ह - येथे बाईक आणि जॅग्वार कारमध्ये मंगळवारी रात्री 12 वाजता टक्कर झाली. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. चौघांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर जीटी आणि ब्रीज कँडी रुगणालयात उपचार सुरू आहेत.

जॅग्वार कार मरीन डाइव्हच्या दिशेने येत होती. कार युटर्न घेत असताना गिरगावच्या दिशेने येणाऱ्या वेगवान बाईकने टक्कर दिली. 

अपघात झाला त्यावेळी बाईकवर दोन जण तर कारमध्ये 2 जण होते. अपघात झाला त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावलेला आहे. त्यामुळे पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे पुढचा तपास करत आहेत.

Loading Comments