जैश-उल-हिंदने घेतली अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक कारची जबाबदारी

जैश-उल-हिंदने म्हटलं आहे की, स्फोटकांनी भरलेली कार फक्त एक ट्रेलर आहे. मोठे चित्र अजून समोर यायचे आहे. अंबानी यांच्या घराजवळ कार सोडणारा सुरक्षित ठिकाणी पोहोचला आहे.

जैश-उल-हिंदने घेतली अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक कारची जबाबदारी
SHARES

मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेर २५ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. या कारची जबाबदारी जैश-उल-हिंद या संघटनेने घेतली आहे. जैश-उल-हिंदने टेलिग्राम संदेशाद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्विकारून बिटकाईनच्या स्वरुपात पैसा मागितला आहे.

जैश-उल-हिंदने म्हटलं आहे की,  स्फोटकांनी भरलेली कार फक्त एक ट्रेलर आहे. मोठे चित्र अजून समोर यायचे आहे. अंबानी यांच्या घराजवळ कार सोडणारा सुरक्षित ठिकाणी पोहोचला आहे. बिटकॉइनच्या स्वरूपात अंबानी यांच्याकडून रकमेची मागणी करीत आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढच्या वेळेस ही कार तुमच्या मुलांच्या मागे असेल, अशीही धमकी देण्यात आली आहे.  

या दहशतवादी संघटनेने आपल्या पोस्टमध्ये तपास यंत्रणेला आव्हान दिलं आहे. थांबवू शकत असाल तर थांबवून दाखवा. आम्ही तुमची नाकाखाली दिल्लीत जे केले, त्यानंतर तुम्ही मोसादसोबत (इस्रायल गुप्तचर यंत्रणा) हातमिळवणी केली. मात्र, काहीही झाले नाही. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काय करायचे आहे. फक्त पैसे ट्रान्स्फर करा.

अल्टामाऊंट रोडवर मुकेश अंबानी यांची भव्य ‘अँटिलिया’ इमारत आहे. अँटिलियापासून जवळच काही अंतरावर एका स्कॉर्पियो कार उभी होती. त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत. मागील बुधवारी मध्यरात्री एक वाजता अँटिलियाजवळ ही स्कॉर्पिओ पार्क केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमधून समोर आलं आहे. तर गुरूवारी दुपारी तीन वाजता या कारबाबत माहिती मिळाली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा